जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांच्या प्रयत्नामुळे गंधारी जांभळी येथे बससेवा सुरू

0
20

अर्जुनी मोरगाव-गंधारी जांभळी हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गाव संपुर्णता जंगलाने वेढलेला गाव आजपर्यंत या गावातील लोकांना प्रवासासाठी ५ किलोमीटर पायपीट करावी लागत असे परंतु जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांनी माननीय जिल्हाधिकारी,मानव विकास विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे साकोली बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक यांचेशी पत्र व्यवहार करुन सतत पाठपुरावा करत राहिले व दिनांक २८/१२/२०२२ ला बससेवा सुरू झाली.माननिय उपाध्यक्ष महोदयांनी फोनवरून माननीय जिल्हाधिकारी, मानव विकास विभागाचे अधिकारी व साकोली आगार प्रमुखांचे अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानले.
बससेवा सुरू करण्यापूर्वी बरेचश्या अडचणी निर्माण झाल्या परंतु गंधारी जांभळी वासी यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपी झाडे श्रमदानातून साफसफाई करुन दिली आणि आज त्यांच्या श्रमाला फलश्रुती मिळाली.गावात आलेली बस पाहुन त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.सर्व गावकऱ्यांनी मिळुन बसच्या चालक आणि वाहकाचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला.हि बससेवा सुरू करण्यासाठी माजि पं.स.सदस्य दिनदयाल डोंगरवार, ग्रामपंचायत चे उपसरपंच दिलीप तिरपुडे,पं.स.सदस्या आम्रपाली डोंगरवार यांनी प्रयत्न केले.