विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिता करीता तात्काळ बोनस द्यावा – खासदार श्री प्रफुल पटेल

0
14

*खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार संपन्न

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना धानाचा बोनस मिळाला, मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी DBT च्या माध्यमातून ६०० करोड मंजूर करण्यात आले आहे परंतु विद्यमान सत्तेत असणाऱ्या सरकारने हे बोनसचे पैसे अजूनही दिलेले नाही याउलट या वर्षी सुद्धा बोनस दिला नाही. राष्ट्रवादीचा काँग्रेस ने शेतकऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे म्हणून शासनाला जागे करण्याकरीता आंदोलने केली आणि शेतकऱ्यांना बोनस न दिल्यास पुन्हा आंदोलन करु पण शेतकऱ्यांचे वाली आम्हीच आहो असे मानणाऱ्या सरकारने अजूनही बोनसची घोषणा केलेली नाही विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये तात्काळ बोनस द्यावा. नागपूरला चालू असलेल्या अधिवेशनाचे २ दिवस शिल्लक आहे. आम्ही विद्यमान सरकारला या वर्षीचा बोनस व मागील वर्षीचा मंजूर बोनस ची राशी तात्काळ शेतकऱ्यांच्या देण्यात यावी अशी मागणी केली आहे असे प्रतिपादन खासदार  प्रफुल पटेल यांनी केले.

आज आशीर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार खासदार  प्रफुल पटेल जी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री पटेल संबोधित करताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांतील तालुक्यातील निकाल लक्षात घेता येणार्‍या निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा न करता चुकांपासुन बोध घेत भविष्यात यश कशाप्रकारे मिळेल या करीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

याप्रसंगी खासदाऱश्प्रफुल पटेलजी यांनी निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून लाखांदूर तालुक्यातील बारव्हा – रणजित नैताम, दिघोरी – सुनीता साळवे, साखरा – करूणा ईश्वरकर, राजनी – संदीप मेश्राम, तावशी – सुनीता फुंडे, चिकना – मनीषा दहीवले, पिंपळगाव – अस्मिता लांडगे, दहेगाव – शैला डोंगरावर, मानेगव – राकेश चुटे, मासळ – प्रणय लांजेवार, बोथली – मनीषा मिसार, खोलमरा – वैशाली नागरीकर, ओपारा – पल्लवी राऊत, जैतपुर- रोहिणी कोरे, खैरी – वर्षा कोरे सहित ग्रामपंचायत सरपंच व शेकडो सदस्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सत्कार कार्यक्रम प्रसंगी खा.. प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंन्द्र जैन, सुनील फुंडे, अविनाश ब्राह्मणकर, नरेश दिवटे, बालुभाऊ चुन्ने, देविदास राऊत, मोहन राऊत, संजनाताई वरखडे, निमाताई ठाकरे, शंकर खराबे, वैशाली हटवार, अतुल परशुरामकर, उषाताई झोडे, लोचन पारधी, सुनीता ताई बिसेन, राकेश राऊत, रजनीकांत खंडारे, सुभाष दिवठे, संजय नहाले, राहुल डोंगरावर, सूरज मेंढे, अंकित पागडे, वैभव पवार, राकेश मुद्दलवार, हितेश झोडे, कैलाश रामटेके, अर्जुन घरत, ललित दाणे, गोविंदा बर्डे, मनोज ठाकरे, उमेश राऊत, अर्पना जांगले, लोचन पारधी, सचिन बरये, अंगत धकाते, मंगेश ब्राह्मणकर, गुलाब नागपुरे, अमित फुलाबंधे, उमेश वणास्कर सहीत बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.