शेतकर्‍यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करावी: एसपी नीलोत्पल

0
15

गडचिरोली-जिल्ह्यातील शेतकरी व इतर जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी. पोलिस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे. नक्षल्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलिस दलाच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासा साधावा, जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून २0 जानेवारी रोजी पोलिस दल, कृषी विज्ञान केंद्र, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालयात एकलव्य सभागृहात कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होते. या मेळाव्यात ३00 हून अधिक शेतकर्‍यांना सोयाबिन, करडई व केळींच्या रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
मेळाव्यास अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, विषय विशेषतज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्‍वर ताथोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक डॉ. अभिजीत कापगते आदी उपस्थित होते.
मेळाव्यात दुर्गम अतिदुर्गम भागातील उपस्थित असलेल्या ३00 शेकर्‍यांमध्ये १३ बचत गटांना प्रत्येकी एक याप्रमाणे १३ स्प्रेअर पंप, १00 शेतकर्‍यांना प्रत्येकी २0 किलो प्रमाणे २000 किलो सोयाबिन बियाणे, ७0 शेतकर्‍यांना प्रत्येकी ३0 किलो प्रमाणे २000 किलो करडई बियाणे व १00 शेतकर्‍यांना प्रत्येकी ३0 याप्रमाणे ३000 केळींची रोपे वाटप करण्यात आली. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/ उपपोस्टे/पोमकें व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनयंज पाटील व अंमलदांनी अथक पर्शिम घेतले.