25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन

0
28

गोंदिया,दि.23 : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी 1950 हा दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करुन घेणे या उद्देशाने दिनांक 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाची ‘मतदानाइतकं अमुल्य नसे काही बजावू हमखास, मताधिकार आम्ही’ ही थीम आहे.

          त्यानुसार सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय व जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी तेरावा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ मतदारांचा सत्कार करण्यात येणार असून मतदार यादीत नाव समाविष्ट झालेल्या 18 ते 19 या वयोगटातील नविन मतदारांना जिल्हाधिकारी यांचेमार्फत मतदान ओळखपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी कळविले आहे.