सुपोषण संगिनी कडून दुर्गम भागातील तरुण मुलींचे पालनपोषण

0
18

गोंदिया:राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, आम्ही भारतातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या तरुण मुलींमधील कुपोषण आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी अनेक सुपोषण संगिनी किती अथकपणे काम करत आहेत याचा आढावा घेत आहोत.आज, आपण जागतिक स्तरावरमहिलांना अडथळे दूर करून उंच भरारी घेताना आणि तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती करताना पाहतो. पण ग्रामीण भागात अनेक तरुण मुली अशक्तपणा आणि कुपोषणाने त्रस्त आहेत,जे प्रत्येक दिवस त्यांची मोठी स्वप्ने साकारणे आणखी कठीण करीत आहे.

जागरूकता, योग्य माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव या प्रमुख कारणांमुळे आजही, विशेषत: ग्रामीण भागात लहान मुले आणि तरुण मुलींमध्ये कुपोषण आणि अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर आहे.या आरोग्यविषयक परिस्थितींबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, अदानी फाउंडेशन ने, अदानी विल्मर लिमिटेडचा सीएसआर उपक्रम च्या अंतर्गत फॉर्च्युन सुपोषण प्रोजेक्ट यशस्वीपणे राबविला आणि  भारतातील 20 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये पाच वर्षांखालील मुले, प्रजननक्षम वयातील महिला आणि तरुण मुलींसाठी अथकपणे काम केले .

हे मुद्दे सुपोषण संगिनी – ग्राम आरोग्य स्वयंसेवकांद्वारे संबोधित आणि हाताळले जातात – जे आरोग्य आणि पोषण बद्दल जागरुकता वाढविण्यात, गंभीर कुपोषित मुलांचा संदर्भ देण्यासाठी, घरामागील न्यूट्री गार्डनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रकल्पाच्या लक्ष्यित लोकसंख्येमध्ये वर्तणुकीतील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

मात्र, काम करण्याच्या ठिकाणी गोष्टी या संगिनींसाठी नेहमीच सोप्या नसतात. आर्थिक अडचणी, सामाजिक कलंक आणि निषिद्ध ही काही आव्हाने आहेत ज्यांचा त्यांना नियमितपणे सामना करावा लागतो. नेहमीच्या गृहभेटीदरम्यान, सुपोषण संगिनी, सुमित्रा बोत्रे, 35, सरा गावात राहणाऱ्या 19 वर्षीय करिश्मा किशनराव राऊत, नागपूर, महाराष्ट्राला हिला भेटल्या.

सुमित्रा यांनी सांगितले, किशोरवयीन मुलगी निस्तेज, कमी वजनाची आणि आणि तिच्यामध्ये कमी एकाग्रतेची चिन्हे दिसली. पण आई-वडिलांनी आधीच तिच्या उपचारांवर बराच खर्च केला होता, ज्यामध्ये कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती आणि ते आणखी खर्च करण्यास तयार नव्हते. “आर्थिक सहाय्य आणि जागरूकता नसणे हे करिश्माच्या उपचारात अडथळा आणणारे काही मोठे अडथळे आहेत. मुलीच्या वडिलांना समस्येची तीव्रता लक्षात येण्यासाठी टीम सुपोषणने 3-4 महिन्यांहून अधिक काळ नियमित समुपदेशन केले,”

बोत्रे पुढे म्हणाल्या, “जेव्हा टीम करिश्माला जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन गेली तेव्हा त्यांना तिच्या हिमोग्लोबिनची पातळी गंभीरपणे कमी असल्याचे आढळले आणि तिला अॅनिमिया असल्याचे निदान झाले. तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आठवडाभरात तिच्यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागली. “उपचारानंतरही आम्ही नियमित फॉलो-अप आणि समुपदेशन चालू ठेवले. करिश्माचे कुटुंब त्यांच्या मुलीला निरोगी, आनंदी पाहून आनंदी आणि समाधानी आहे आणि आम्ही वेळेवर केलेल्या इंटरवेंशन बद्दल कृतज्ञ आहे,”

नेहमीच जागरूकतेचा अभाव नसून पालकांपर्यंत पोहोचण्यात अडचण हे कठीण आव्हान बनते. आणखी एक संगिनी, कलावतीबेन वसावा, 28, पुढे म्हणाल्या, “किशोरवयीन मुलींसोबत गटचर्चा करताना, मला गुजरातमधील भुछड गावातील 21 वर्षीय अमिता नंदोड भेटली, जिला सतत सुस्त आणि दीर्घकाळ थकवा जाणवत होता.”

कलावतीबेन वसावा पुढे म्हणाल्या, “स्थानिक आरोग्य केंद्रात काही चाचण्या केल्यानंतर, तिच्या हिमोग्लोबिनची पातळी खूपच कमी असल्याचे समोर आले. तिचे आई-वडील मजूर होते आणि तिच्या वडिलांना अमली पदार्थांच्या सेवनाच्या गंभीर समस्या होत्या त्यामुळे पालकांना या समस्येची गंभीरता समजावून देणे हे आम्हा संगिनींसाठी मोठे काम बनले आहे.”

कलावतीबेन वसावा पुढे म्हणाल्या, “त्यामुळे, त्यांनी अमिता यांना वेगवेगळ्या अन्न गटांबद्दल शिक्षित करून मदत करण्याचे ठरवले ज्यामुळे तिची हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते, स्थानिक पातळीवर उपलब्ध घटकांसह पौष्टिक जेवण कसे तयार करावे आणि लोह आणि फॉलिक ऍसिडच्या बाह्य स्रोतांचे महत्त्व सांगितले.“या छोट्या छोट्या गोष्टींमुळे अमिताला चांगले आणि निरोगी होण्यास मदत झाली. आता, तिचे आई-वडीलसुद्धा त्याचे रिझल्ट आणि आमच्या टीमने आणि अमिता यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे खूश आहेत,”

सुमित्रा आणि कलावतीबेन या दोघींनी प्रतिध्वनीत केले, “एक संगिनी म्हणून आम्हाला दररोज अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो, परंतु जेव्हा आम्ही एका कुटुंबाला, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एका तरुण मुलीला मदत करू शकतो, तेव्हा आम्हाला खरोखरच धन्य वाटते. या उपक्रमांमुळे आम्हाला शक्य तितक्या तरुण मुलींना मदत करण्यासाठी आणि अजून काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यात मदत झाली आहे,”

2016 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून, 500 हून अधिक सुपोषण संगिनी फॉर्च्यून सुपोषणशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या वेळेवरकेलेल्या इंटरवेंशनमुळे हजारो तरुण किशोरवयीन मुलींना अनेक ठिकाणी आधार मिळाला आहे.