जिल्हा परिषदेचे सांस्कृतिक व क्रिडा समेंलन 9 व 10 फेबुवारीला

0
33

गोंदिया,दि.29ः गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हापरिषद,पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचारी वर्गासाठी क्रिडा व सांस्कृतीक समेंलनाचे आयोजन यावर्षी 9 व 10 फेबुवारीला करण्यात आले आहे.या समेंनाचे उदघाटन 9 फेबुवारीला सकाळी 8 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर,अर्थ व बांधकाम सभापती संजयसिंह टेंभरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे,महिला बालकल्याण सभापती श्रीमती सविता पुराम व समाजकल्याण सभापती श्रीमती पुजा सेठ या उपस्थित राहणार आहेत.सकाळी 8 वाजेपासून विविध क्रिडा खेळांना सुरवात होणार असून आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.त्यानंतर सायकांळी 4 वाजता जिल्हा परिषद सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.10 फेबुवारीला सकाळी 8 वाजता क्रिडा स्पर्धेतील अंतिम स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.तर सायकांळी 4 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचा समारोप ठेवण्यात आलेला आहे.समारोपानंतर कर्मचारी अधिकारी वर्गाकरीता अल्पोहाराची सोय सायकांळी 6 वाजता करण्यात आली आहे.या स्पर्धेमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे सहभाग नोंदवू शकतात असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले आहे.