कचारगड यात्रेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल अधिसूचना निर्गमित

0
26

गोंदिया दि. 31: कचारगड यात्रेनिमित्त आमगांव – सालेकसा- डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते.  सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या जीवितास धोका होवू नये याकरीता आमगांव – सालेकसा डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने ये-जा करणारी अवजड वाहने (एस.टी. बसेस, टप्पा वाहतूकीचा परवाना असलेली खाजगी प्रवाशी वाहने, अॅम्बुलन्स, स्कुल बसेस, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, शासकिय मालकीची वाहने वगळुन) यांच्या आवागमनास 03 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 05.00 वा. ते 07 फेब्रुवारी 2023 रोजी  19.00 वा. पर्यंत जिल्हाधिकारी  चिन्मय गोतमारे यांनी तात्पुरते मनाई आदेश जारी केले आहेत.

          जिल्ह्यातील पो.स्टे. सालेकसा हद्दीत मौजा कचारगड (धनेगांव) येथे 03 फेब्रुवारी 2023 ते 07 फेब्रुवारी 2023 पर्यंत “महाकाली कंकाली कोपरलिंगा” यात्रा होणार आहे. सदर यात्रेमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. सदर ठिकाणी भाविकांची व त्यांचे वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. आमगांव – सालेकसा- डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे यात्रेतील लोकांची गैरसोय होऊन गंभीर स्वरुपाचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानुसार सदर यात्रेदरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या जीवितास धोका होवू नये याकरीता आमगांव – सालेकसा डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने ये-जा करणारी अवजड वाहने (एस.टी. बसेस, टप्पा वाहतूकीचा परवाना असलेली खाजगी प्रवाशी वाहने, अॅम्बुलन्स, स्कुल बसेस, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, शासकिय मालकीची वाहने वगळुन) यांच्या आवागमनास 03 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 05.00 वा. ते 07 फेब्रुवारी 2023 रोजी 19.00 वा. पर्यंत तात्पुरते मनाई आदेश जारी करण्यात येत आहे.

          उपरोक्त नमूद कालावधीत मनाई करण्यात आलेल्या अवजड वाहनांना आमगांव देवरी – डोंगरगढ (छ.ग.) या पर्यायी मार्गाने आवागमन करण्याचे आदेश जारी करण्यात येत आहे. उपरोक्त आदेशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया यांनी प्रभारी अधिकारी, पो.स्टे. सालेकसा, गोंदिया यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी  सूचनात्मक वाहतूक चिन्हे, बोर्ड लावून घ्यावेत यावेत व याबाबत व्यापक प्रसिध्दी जारी करण्यात यावी. सदरची अधिसुचना 3 फेब्रुवारी 2023 पासुन अंमलात येईल.