Home विदर्भ शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

0

वरोरा- शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी वरोरा येथील तहसील कार्यालयावर रमेश राजूरकर व किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी राजूरकर सर्मथक बरेच राजकीय वतरुळातील नेते उपस्थित होते. बर्‍याच कालावधीपासून शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याने राजूरकर सर्मथक कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चाचे आयोजन गुरुवारी सकाळी वरोरा तहसील कार्यालयावर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते तथा माजी आ. वामनराव चटप, डॉ. विजय देवतळे, प्रहारचे किशोर डुकरे, बाळूभाऊ भोयर आदी राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला.
शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी कापूस, सोयाबीन पीकांवरील आयात थांबवून निर्यातीबाबत निर्णय घेण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकर्‍यांना येत्या आठ दिवसांत पूर्ण रक्कम देण्यात यावी व शेतमालावरील वायदे बंदी उठवावी, अशी मागणी यावेळी राजूरकर यांनी केली. शेतकर्‍यांचे थकीत वीज बिल असलेल्या शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये, अजूनपयर्ंत चालू शेतकर्‍यांना कर्ज माफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या खात्यात लाभ जमा करावा, असे मत प्रहारचे किशोर डुकरे यांनी व्यक्त केले.
शेती मशागत, पेरणी ते माल विकण्यापयर्ंत येणार्‍या खर्चावर दीड पट भाव देण्यात यावा, नाफेडद्वारे होणारी चना खरेदी प्रति हेक्टर ७.५ वरून १५ क्विंटल करण्यात यावी, अतवृष्टी मदतीपासून दूर राहिलेल्या शेतकर्‍यांना त्वरित मोबदला देण्यात यावा, ज्या शेतकर्‍यांनी वीज डिमांड भरली आहे अशा शेतकर्‍यांना दोन महिन्यात कृषी पंप वीजजोडणी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, ऑनलाईन ७/१२ मधील चुका सरकारने लवकर दुरुस्ती कराव्यात, शेतीचे कामे संपल्यानंतर शासनामार्फत शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. वरील सर्व मागण्या शेतकर्‍यांच्या हितासाठी असून महाराष्ट्र व केंद्र सरकारने याची दखल घेत शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी डॉ. विजय देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्यासोबत वातार्लाप करताना केली. यावेळी शेतकर्‍यांनी शासनाला भेट करण्यासाठी कापूस तसेच सोयाबीन सोबत आणले होते. मात्र, पोलिसांनी ते जप्त केले.
वरोरा शहराच्या डॉ. आंबेडकर चौकामधून निघालेला मोर्चा थेट तहसील कार्यालयाच्या उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या दालनात निवेदन देऊन संपवला. मात्र यावेळी शेतकरी आक्रमक असून सुभाष शिंदे यांना आपल्या तक्रारी सांगितल्या. स्थानिक प्रशासनातील चुका लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल असेही आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. यासाठी तलाठय़ांना विभागीय सूचना देऊन त्या ठिकाणच्या अडचणी दूर करण्याचे तत्काळ आदेश दिल्याने शेतकर्‍यांचे समाधान झाले. या मोर्चासाठी रमेश राजुरकर, विजय देवताळे, जयंत टेंमुर्डे, विजय मोकाशी, किशोर डुकरे, बाळूभाऊ भोयर आदी राजकीय नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version