राजाभोज जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन ४ रोजी

0
23

फुलचूरसह अनेक गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया : पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमी पर्वावर साजरी करण्यात येते. यंदाही वसंत पंचमीच्या पर्वावर शहरात पवार प्रगतीशील मंच गोंदिया, फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री, कुडवा, सूर्याटोला आदी गावात राजाभोज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून शहरात या गावातील समाज संघटेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
छत्रिय चक्रवर्ती सम्राज राजाभोज यांचे जयंती पर्व वसंत पंचमीपासून सुरू झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावात समाज संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती पर्व साजरा करण्यात येत आहे. त्यातच गोंदिया शहरात लगतच्या गावांना घेवून येत्या ४ फेब्रुवारी रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पवार प्रगतीशील मंच गोंदिया, फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री, कुडवा, सूर्याटोला आदी गावात राजाभोज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून शहरात या गावातील समाज संघटेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. फुलचूर येथे चक्रवर्ती पोवार समाज संघटने फुलचूरच्या वतीने ४ व ५ फेब्रुवारी रोजी दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ फेब्रुवारी रोजी संगीत खुर्सी, हळदी-कुंकू, जागरण व महाप्रसादाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. सभापती संजयसिंह टेंभरे करणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले राहणार आहेत. कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, पं.स.सदस्य स्नेह गौतम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून पं.स. उपसभापती देवरी अनिल बिसेन, प्रगतीशील मंच अध्यक्ष अ‍ॅड पृथ्वीराज चव्हाण, महिला अध्यक्ष ईशा गौतम, वडेगाव सरपंच अंजु बिसेन, सरपंच कुलदीप पटले, ह.भ.प. एम.ए. ठाकुर, संजना पटले, माणिकचंद बिसेन उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला शहरातील समाज बांधवांसह लगतच्या गावातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.