गोंदिया,दि.02ः- तालुक्यातील पिंडकेपार येथे बिरसा मुंडा चौकात महामानव क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा महामानव क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रतिमा दान देणारे किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय कोठेवार होते.विशेष अतिथी म्हणून आनंद चर्जे, टेकचन्दजी गाते, महेंद्रजी ताराम, सालिनीताई राऊत (सरपंच पिंडकेपार) राजेशजी टालटे (जमीन दानदाता) हेतरामजी राहांगडाले(पोलीस पाटील पिंडकेपार) डोंगरवार मॅडम, चौधरी मॅडम, महेंद्र अंबाडारे इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अजय वैद्य यांनी व मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष लालजी कोठेवार यांनी केले.आभार प्रदर्शन जयपाल गाते यांनी केले.अनावरण सोहळाप्रसंगी उद्घाटक जितेश राणे यांनी बिरसा मुंडा यांनी जसं देशाच्या क्रांतीसाठी समाजाला एकवट करून बहुजनांना जागृत करून इंग्रजांना पळवून लावले तसेच आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोकांना जागरूक होऊन सत्ताधारी अंग्रेजांना पळवायचे असा संदेश दिला.आयोजनासाठी बारकू गाते, हेतराम गाते, फेकचंद टालटे, सेवकराम राऊत, नारायण गाते, श्रावण गाते, यादराव गाते, जगदीश गाते, राधेलाल कोठेवार, हाऊसलाल, टालटे, कन्हैयालाल टालटे, गणेश गाते, शंकर टालटे, तुकाराम राऊत, महेश गाते, प्रेमलाल गाते, रमेश गाते, सोमा मळावी, सुखदेव चुल्पार, हेमराज गाते, दिनेश गाते, रामचंद्र सदाशिव गोडरे, उमेश गाते, खेमराज गाते, रवींद्र गाते, नरेंद्र गाते, गजेंद्र खांडवाय, सुनील मळावी, ओमकार गाते, मनोहर गाते, बाळकृष्ण मरकाम, लालचंद गाते, टेकचंद मरकाम, रेखलाल मडावी, गेंदलाल मडावी, भावलाल टालते संतोष गाते, तिलकचंद चुल्पार, रूपलाल कोठेवार, हेमंत कोठेवार, सुक्रेश मरकाम, राजू सरसाटे, नारायण वरकडे, बळीराम टालते, रामेश्वर भोयर, मिथुन गाते, लीलाधर गाते, अतुल गाते, अरुण मळावी, बंटी गाते, सुनील मळावी, प्रज्वल गाते, दिलीप चुल्पार, विजय चुल्पार, अजय डोंगरे, किशोर गाते, अनिल गाते, रनिंग गाते, रवींद्र गावड, अर्जुन कोठेवार, शुभम गाते, महेंद्र गाते, मुकेश गाते, शैलेश भोयर, विशेष मळावी, पुरब गाते, संगम राऊत, अजित गाते, गोल्डी चुल्पार, योगेश टालते, मिनेश टालते, सुदेश टालते, नितेश गाते, कैलास भोयर, भोजराज मळावी इत्यादी समाज बांधवांनी सहकार्य केले.