स्नेह संमेलनातून मिळते सुप्त गुणांना चालना: चंद्रकुमार बहेकार

0
13

भजेपार येथील जि.प. शाळेत वार्षिकोत्सव साजरा

सालेकसा: स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळते. सोबतच सततच्या अभ्यासाचे ताण तणाव दूर होतात. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण होते. त्यामुळे आनंददायी शिक्षणासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळेत झालेच पाहिजेत. असे प्रतिपादन सरपंच चंद्रकुमार बहेकार यांनी केले.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भजेपार येथील वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, पालकांनी केवळ आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांच्यातील प्रतीभा ओळखून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांना करिअर बरोबरच आपले छंद देखील जोपासता येईल. आजच्या काळात शासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडू लागल्या आहेत. यांना संजीवनी देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टेकचंद बहेकार तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, ग्रा.पं. सदस्य रविशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वताबाई भलावी, आत्माराम मेंढे, आशा शेंडे,
ममता शिवणकर, खुशाल शिवणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रेवत मेंढे, पालिकचंद मेश्राम, संजय चुटे, रविंद्र बहेकार,शोभा बहेकार, रवी नोणारे, नरेश फुन्ने, केंद्रप्रमुख डी. व्ही. भुते, शाळा समिती उपाध्यक्ष प्रतिमा बहेकार, गुड्डू ब्राह्मणकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका एम एम देवरे मॅडम यांनी प्रास्ताविकातून शाळेची आणि उपक्रमांची माहिती दिली. सूत्र संचालन शिक्षक राजेश भोयर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक घासले यांनी मानले. दरम्यान लोकनृत्य, समूह नृत्य, एकल नृत्य, एकांकिका, कोळी नृत्य आदी अनेक प्रकारचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शालेय शिक्षक
जि .एन तुरकर, एन. जी. घासले, आर .एम. भोयर, व्ही.एस. मेश्राम, शिक्षण स्वयंसेवक अरुण कोठेवार यांनी अथक परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.