प्रगटदिनोत्सव निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
19

गोंदिया:  श्री संत गजानन महाराज स्मारक संस्था गोंदिया तर्फे प्रगटदिनोत्सव निमीत्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाला उद्या दि.11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी (शनिवार) 11 फेब्रुवारी 2023 पासून डब्लींग ग्राऊंड, सिव्हिल्लाईन येथे सदर कार्यक्रम आयोजित होणार आहे.तर गजानन काॅलनी (कुडवा)येथे रविवार 12 व 13 फेबुवारीला आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.11/02/2023 रोजी सकाळी 7.00 वा. श्रींचा जलाभिषेक नंतर आरती व प्रसाद वितरण होईल. तसेच रात्री 9.00 वाजता श्री हनुमान चालीसाचे पाठ आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दि.12/02/2023 रोजी सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक व आरती तसेच सायंकाळी 4.30 वा. श्रींची पालखी व शोभायात्रा काढण्यात येईल.

सोमवार दि.13/02/2023 रोजी प्रगट दिनाच्या कार्यक्रमानिमीत्त सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक, सत्यनारायण पुजा व आरती तसेच सायंकाळी 4.30 वाजता श्री पियुषबुवा धुमकेकर, नागपुर ,गजानन काॅलनी येथे भजियापार येथील नानीकराम टेंभरे यांचे सुश्राव्य किर्तनाचे कार्यक्रम तथा संध्याकाळी 7.00 वाजता प्रसाद वितरण करण्यात येईल.

मंगळवार दि.14/02/2023 रोजी सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक व आरती तसेच सायंकाळी 4.30 वा. श्री पियुषबुवा धुमकेकर, नागपुर यांचे सुश्राव्य किर्तनाचे कार्यक्रम यानंतर श्री पंकज रहांगडाले, अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया व आमदार श्री विनोद अग्रवाल यांचा सत्कार कार्यक्रम तथा संध्याकाळी 7.00 वाजता गोपालकाला प्रसाद वितरण करण्यात येईल.

बुधवार दि.15/02/2023 रोजी दासनवमी निमित्ताने सकाळी 9.00 वा. शिवशक्ती यज्ञ, तसेच परमपूज्य सद्गुरुनाथ महाराज, नागपूर द्वारा दुपारी 1.00 वाजता पूर्णाहुती. यानंतर दुपारी 2.00 वा. महाप्रसादचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.