बिबटं वाघाच्या क्षेत्रात गेला अन् जीवाला मुकला

0
23
file photo

चंद्रपूर : बिबटं वाघाच्या अधिवास क्षेत्रात आल्याने दोघांत झुंज झाली. यात बिबट्याला जीव गमवावा लागला. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव वनपिरक्षेत्रातील कक्ष क्रमांक २६७ मध्ये घडली. वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

वनविभागाच्या पथकाने माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बिबट्याच्या शरीरावर वाघाने ओरबडल्याच्या जखमा आहेत. शवविच्छेदनानंतर बिबट्याला अग्नी देण्यात येणार आहे. यावेळी सहायक उपवनसंरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्राधिकारी सालकर, क्षेत्रसहायक बुरांडे यांच्यासह वनरक्षक व वनकर्मचारी उपस्थित होते.