अनेक वर्षानंतर पिपरीया फरिसरातील जनतेला झाले लालपरीचे दर्शन

0
18

अखेर गोंदिया ते गल्लाटोला एस.टी.बस सेवा सुरू
आमदार कोरोटे यांचा पुढाकार व प्रयत्नाला मिळाले यश

सालेकसा, दि.२२: रोंढा ते गल्लाटोला या मार्गावरील एस.टी.बस सेवा गेल्या सात वर्षापासून बंद होती. ही बससेवा रोंढा ते नाकालिंबा ३ कि.मी.,नाकालिंबा ते पिपरिया ४ कि.मी. व पिपरिया ते गल्लाटोला ४ कि.मी. अशाप्रकारे या ११ कि.मी.मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील बस सेवा बंद झाली होती. गेल्या सोमवारी या भागातील जनतेला लालपरीचे दर्शन अनेक वर्षानंतर झाल्याने त्यांनी आमदार कोरोटे यांचे आभार मानले.
गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत आमदार सहसराम कोरोटे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती गेल्या सोमवार पासून या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरू केली. यामुळे रोंढा,नाकालिंबा, पिपरिया व गल्लाटोला भागातील जनतेला लालपरीचे दर्शन झाले. परिणामी,या भागातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.
पिपरिया, रोंढा, नाकालिंबा, निंबा, गल्लाटोला या परिसरातील लोकांना शासकीय व खाजगी कामाकरिता सालेकसा व गोंदिया जिल्हामुख्यालयात जावे लागत होते. त्यांना या कामात त्यांचा वेळ व आर्थिक भुंदर्ड बसत होते. त्यामुळे या भागातील सर्व जनतेची प्रथम मागणी ही एस.टी. बस सेवा सुरू करण्याची होती. त्यामुळे आमदार कोरोटे हे आमदार होताच प्रथम या मार्गाची दयनीय व्यवस्था मुख्यमंत्री सडक योजनेतून सतत पाठपुरावा व प्रयत्न केल्याने या मार्गाचे नविनीकरण करून एस.टी.च्या आगार प्रमुख यांना सूचना देऊन या मार्गावर बस सेवा सुरू केली.
गोंदिया वरून सालेकसा मार्गे गल्लाटोला पर्यन्त एस. टी. बस आल्याने प्रथम सालेकसा तालुका काँग्रेसच्या वतीने वाहक व चालकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी सालेकसाचे पं. स.सभापती प्रमिला गणवीर, उपसभापती संतोष बोहरे, तालुका उपाध्यक्ष राजू दोनोडे, शहर अध्यक्ष निर्दोष साखरे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय फुंडे, पं. स.गटनेता जितेंद्र बल्हारे, युवानेता ओमप्रकाश लिल्हारे, उपसरपंच गुणाराम मेहर, ग्रा.पं. सदस्य गणराज कोरोटे, पुस्तकला बल्हारे, लिना चौधरी, अशोक चौधरी, संदीप लिल्हारे, दिलीप टेकाम, किशोर भोयर आदींनी बस चे वाहक व चालक यांचे भव्य स्वागत केला