41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ कामकाजात हयगय,गोंदियात तीन महिला पोलीस शिपाई निलबिंत

कामकाजात हयगय,गोंदियात तीन महिला पोलीस शिपाई निलबिंत

0
71

blank

गोंदिया,दि.26ः- गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयांतर्गत येत असलेल्या तीन महिला पोलीस शिपाई यांना आपल्या कामकाजात हयगय केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी निलबित केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही महिला पोलीसांची नियुक्ती जिल्हा न्यायालयात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेली होती.मात्र ज्याठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली,त्याठिकाणी त्यांचे कार्य समाधानकारक नसल्याचे समोर आल्याने व आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी निलबिंत करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदेश केंजळे यांनी बेरार टाईम्सला दिली.यामध्ये रामनगर पोलीस ठाणे,डुग्गीपार पोलीस ठाणे व महिला सेल मधील महिला पोलीस कर्मचारीचा समावेश आहे.

blank