Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यातून ऍड वसंत चुटे तर भंडारा मधून मनीष वंजारी नागपूर विद्यापीठ...

गोंदिया जिल्ह्यातून ऍड वसंत चुटे तर भंडारा मधून मनीष वंजारी नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या रिंगणात

0

सिनेट निवडणूक दिनांक १९ मार्च २०२३ रोजी

गोंदिया,दि.२६ फेब्रुवारी-नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून अभाविप व विद्यापीठ शिक्षण मंचच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट प्राधिकरणाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व नागपुर विद्यापीठ शिक्षण मंचाने आपले खुल्या प्रवर्गातून पाच आणि राखीव प्रवर्गातून पाच असे दहा उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उभे केले असून सर्व दहा ही उमेदवारांचे नामांकन अर्ज विद्यापीठाला सादर करण्यात आले. खुल्या प्रवर्गातून विष्णू चांगदे, अजय चव्हाण, वसंत चुटे, निलेश गावंडे, मनीष वंजारी तर राखीव गटातून ओबीसी प्रवर्गातून सुनील फुडके, एस.टी प्रवर्गातून दिनेश शेराम, एन.टी प्रवर्गातून वामन तुर्के, एस.सी प्रवर्गातून प्रथमेश फुलेकर, महिला प्रवर्गातून रोशनी राहुल खेलकर यांचे नामांकन अर्ज विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ कल्पनाताई पांडे, सचिव डॉ सतीश चाफले निवडणूक प्रमुख कल्याण देशपांडे, डॉ.समय बनसोड, प्रशांत कुकडे, प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य महेंद्र निंबार्ते, किशोर वाघाये यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्तीत होते. सिनेट निवडणुकीकरिता सर्व उमेदवारांचे अभिनंदन भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, खासदार सुनील मेंढे, डॉ परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, माजी मंत्री राजकुमार बडोले, संजय भेंडे, वीरेंद्र अंजनकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, बाळा काशिवार, रामचंद्र अवसरे, संजय पुराम, अभाविप प्रदेश उपाध्यक्ष उमेश आगाशे, अतुल कावळे, भंडारा जिल्हा प्रमुख डॉ नितीन नवखरे, विभाग संगठन मंत्री रोशन ठाकरे, जिल्हा संगठन मंत्री आदित्य केंदळे, गोंदिया जिल्हा संगठन मंत्री ईश्वर रेवनशेट्टे, अशोक शेंडे, संजय कुलकर्णी, डॉ नीलकंठ लंजे, डॉ अजय मोहबंशी, हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, पद्माकर बावनकर, प्रशांत खोब्रागडे, खोमेश रहांगडाले, नरेंद्र बाजपेयी, राजेश मलघाटे आदींनी अभिनंदन केले.

Exit mobile version