मुंडीपार येथे पीक प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

0
37

गोरेगांव: – पंचायत समिती गोरेगांव येथील कृषी विभागाच्या अंतर्गत जिल्हा निधी योजना मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्रातील मुंडीपार ग्रामपंचायत कार्यालय येथे पीक प्रात्यक्षिक कार्यशाळा पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे,प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य शितलताई बिसेन,गोरेगांव पं.स.सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम,कृषी अधिकारी(पं.स.)डी.बी उईके,जिल्हा कृषी अधिकारी राहांगडाले, तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे,विस्तार अधिकारी (पंचायत) टि.डी.बिसेन,विस्तार अधिकारी (कृषी)रामटेके,मुंडीपार ग्रामपंचायत सरपंच प्रेमलता राऊत ,उपसरपंच भाऊलाल कटरे,माजी उपसरपंच तथा वर्तमान सदस्य जावेद खान,सचिव अरविंद साखरे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्यगण व मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात माननीय जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी बदलत्या काळातील शेती व यांत्रिकीकरण तसेच शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन शेती करावे ईत्यादी मार्गदर्शन केले.पं.स.सदस्य महारवाडे यांनी सेंद्रिय शेतीवर भर देण्यास सांगितले.जिल्हा कृषी अधिकारी राहांगडाले यांनी गावठी बोरच्या झाडावर एप्पल बोरचे झाडाचे रुपांतर कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक करुन दाखविले.तालुका कृषीअधिकारी सुलक्षणा पाटोळे यांनी कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी सुमित चुंचूवार व परिणक संघचालक रोहित पांडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी अधिकारी डी.बी.उईके यांनी केले.तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (कृषी)सुमित चुंचुवार यांनी मानले.सदर कार्यक्रमाला शेतकरी बांधव व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.