देसाईगंज एसडीओसह सात उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची होणार चौकशी

0
59

नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे आदेश धडकला

गडचिरोली दि.०३–नागपूर विभागातील तब्बल आठ उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यासाठी महसूल व वन विभागाचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी ५ जानेवारीला नागपूर विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असून यात देसाईगंज येथील उप विभागीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याने महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शर्तभंग केल्याची सकृतदर्शनी पुरावे असतांना देखील आर्थिक गैर व्यवहार करून हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे.शर्तीने धारण केलेल्या कृषीक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग-२ धारणाधीकारावर किंवा भाडेपट्टीवर प्रदान केलेल्या शेत जमिनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये देय रूपांतरण अधिमुल्य प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रातील शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५०% एवढी रक्कम घेऊन आदेश पारित करण्यापूर्वी अधिनियमातील नियम ३ (२) वरील उप-नियम(१) मध्ये अटी व शर्त भंग झाले नसल्याबाबत सक्षम महसूल अधिकाऱ्याचा मोका चौकशी अहवाल घेणे बंधनकारक होते.
८ मार्च २०१९ ला निर्गमित झालेल्या महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेतील तरतुदींचे तंतोतंत अनुपालन न करता शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडविण्यास कारणीभूत असणाऱ्यां अधिकाय्रांची विभागीय चौकशी करून बुडविलेला महसूल त्यांच्या कडूनच सक्तीने वसूल करून तात्काळ निलंबित करण्याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील उप विभागीय अधिकारी यांच्या विरुद्ध संदर्भ क्रमांक ३५०/२०२२ अन्वये ५ जानेवारी २०२३ ला नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवले आहे.
या पत्रात उप विभागीय अधिकारी सावनेर, उप विभागीय अधिकारी वरोरा, उप विभागीय अधिकारी देवरी, निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर, उप जिल्हाधिकारी सांगोला व अतिरिक्त जिल्हाधिकारी कारंजा घाडगे यांचाही समावेश असुन या आठही उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून तात्काळ उचित कार्यवाही करून शासनाला अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत.