आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. ८ मध्ये १.१६ कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन

0
23

गोंदिया  –गोंदिया विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी मंजूर विकासकामे करण्यात आले असून या सोबतच आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रभाग क्र.८ मध्ये १.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्या कामाचे भूमिपूजन  आमदार विनोद अग्रवाल व माजी नगरसेवक सौ.सुधा विजय पांडे, सौ.आशा बेळगे व इतर महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल यांनी शहराच्या विकासाचा आराखडा थोडक्यात सांगताना सांगितले की, गोंदिया शहरातील पाण्याची व्यवस्था, चांगले रस्ते बांधणे, उद्यान बांधणे, हाय मास्ट लाईट ड्रेनची व्यवस्था, सीटी सर्व्हे,६ आरोग्य आरोग्य केंद्र बांधले जाणार आहेत.अशी अनेक विकासकामे झाली आहेत.तसेच येत्या दीड वर्षात गोंदिया शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येणार आहे.गोंदिया शहरात विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, हा निधी कोणाचाही वैयक्तिक नसून, हा निधी शासनाकडून परिसराच्या विकासासाठी दिला जातो, निधी कोणताही असो परंतु शासनाकडून मंजूरी कुणी आणली यावर अवलंबून आहे.कोणत्याही कामाचे श्रेय घेत नाही असे म्हणाले.

या कार्यक्रमामध्ये आमदार विनोद अग्रवाल,कशिश जयसवाल शहर अध्यक्ष,माजी सभापती घनश्याम पाणतवणे,माजी उपाध्यक्ष शिव शर्मा,अध्यक्ष महेश गोयल,रमाकांत अग्रवाल, रितेश अग्रवाल,ललित दादरीवाल,अनिल हुद्दानी,राजेन्द्र कावडे, अहमद मनिहार,विक्की  यादव,राम पुरोहित,विनोद किराड,मोन्या नागदवने महामंत्री, धर्मेन्द्र डोहरे, लालू  शर्मा श्याम बेलगे, श्रीमती सुधा विजय पांडे(पूर्व पार्षद), आशा बेलगे, मीराबाई आंकड़े, मैथिली पुरोहित, वंदना शर्मा, ऋषि जयसवाल, शशि गुप्ता, रिंकू शर्मा, संजू शर्मा, कपूरचंद रोचवानी, खलील फांडण, गोपी गुप्ता, टीटू कालिया, गट्टू शेख, पीनू दीवानीवाल, अमित यादव, भवानी यादव, हारून फांडण, चेतन भोलावे कार्यकर्त्ता व प्रभागवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.