कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी:शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी व निवड श्रेणी लावा

0
76
गोंदिया,दि.03ः शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी व निवड श्रेणी लावण्यात यावी, शाळा सकाळ पाळीत भरविण्यात यावी या मागणी सह प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. २ मार्चला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्याशी चर्चा करण्यात आली.उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी दिघोरे उपस्थित होते.
   शिक्षकांचे चटोपाध्याय वेतन श्रेणी प्रस्ताव व निवड श्रेणी प्रस्ताव प्रलंबित आहेत.ते प्रस्ताव मंजुर करण्यासाठी कार्यवाही करून शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी व निवड श्रेणी लावण्यात यावे.उन्हाची तीव्रता अधिक वाढत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेत शाळा सकाळ पाळीत भरविण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.उन्हाची दाहकता लक्षात घेता लवकरच शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी संघटनेला दिले.यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके,किशोर डोंगरवार, अमित गडपायले, अजय शहारे, अविनाश गणवीर व अन्य पदाधिकारी, लिपिक उपस्थित होते.