पवनी /धाबे येथे जागतिक महिला दिन बुधवारी

0
14

पॅनकार्ड , आधार, आभा, आयुष्यमान कार्डसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अर्जुनी /मोर ता.5:- तालुक्यातील पवनी /धाबे ग्रामपंचायतीच्या सभागृहात बुधवारी (ता.8) जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन, गोंदिया जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या हस्ते होणार असून, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, अर्जुनी /मोर पंचायत समितीच्या सदस्य श्रीमती चंद्रकला ठवरे आणि नवेगावबांधचे ठाणेदार संजय पांढरे उपस्थित राहणार आहेत. सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गोंदिया जिल्हा पोलीस विभाग आणि पवनी /धाबे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आहे.या कार्यक्रमात क्षेत्रातील महिला सरपंच,आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांचे पॅनकार्ड, आधार कार्ड, आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड तय्यार करण्यात येणार असून त्यांच्याकडून आवश्यक दस्तऐवजांसह अर्ज मागविण्यात येणार आहेत. अशी माहिती श्रीमती नंदेश्वर यांनी दिली.तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन उपसरपंच पराग कापगते, पवनी /धाबेचे सहाय्यक ठाणेदार जनाब अजहर शेख आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी केले आहे.