जागतिक लठ्ठपणा दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे जनजागृती अभियान

0
15

गोंदिया, दि.8 : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे संकल्पनेतुन वैद्यकीय शिक्षण औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लठ्ठपणा दिन (World Obesity Day) निमित्ताने स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियान दिनांक 4 मार्च पासून सुरु करण्यात आले.

        त्यानुसार 4 मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाद्वारे जनजागृती अभियान निमित्ताने जिल्ह्यातील रामनगर म्युनसीपल हायस्कुल रामनगर येथे 36 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एस.एस.अग्रवाल गर्ल्स स्कूल गोंदिया येथे 126 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मनोहर म्युनसीपल स्कूल गोंदिया येथे 40 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, सिव्हील लाईन गोंदिया येथे 87 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व शारदा हायस्कूल गोंदिया येथे 101 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

         वरील सर्व माध्यमिक शाळा/महाविद्यालयांमध्ये इयत्ता 7 वी ते 9 वीच्या एकूण 390 विद्यार्थ्यांची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील अध्यापक, समाजसेवा अधीक्षक तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे एमबीबीएस विद्यार्थी यांच्या चमूने उंचीचे प्रमाणात वजन (BMI) तपासून स्थुलत्व/लठ्ठपणा आढळून येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सकस आहार व नियमीत व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये आलेल्या रुग्णांची स्थुलपणा तपासणी BMI नुसार करण्यात आली. सदर तपासणी दरम्यान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी बाह्यरुग्णामध्ये उपस्थित रुग्णांना जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल करणे, सकस आहार व नियमीत व्यायाम केल्यास स्थुलपणास प्रतिबंध व त्यामुळे होणारा आजार टाळता येईल असा संदेश दिला.

         सदर अभियान यशस्वीपणे पार पाडण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे, स्थुलपणा अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.श्रीकांत मेश्राम, डॉ.सुनिल देशमुख, डॉ.संजय माहुले, डॉ.राजेंद्र वैद्य, डॉ.राजेश कटरे व संस्थेतील सर्व समाजसेवा अधीक्षक यांनी परिश्रम घेतले.