जागतिक महिला दिनानिमित्त देवरी प्रकल्प कार्यालय व जिल्हा न्यायालयात कार्यक्रमाचे आयोजन

0
16

(रांगोळी स्पर्धागायनकविता वाचन)

गोंदिया, दि.9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया , जिल्हा वकील संघ गोंदिया व एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालय गोंदिया येथे आयोजित करून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.

         न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच न्यायाधीश एस.व्ही. पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व  निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे उपस्थित होत्या.जागतिक महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमांमध्ये एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया येथील विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध पेंटिंगच्या प्रदर्शनीचे अनावरण न्यायाधीश वानखेडे तसेच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.

         जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजची महिला ही विविध क्षेत्रात म्हणजे शासकीय-निमशासकीय, स्पोर्ट, सायंटिस्ट, राजनीती कुठेही महिला मागे राहिलेली नाही असे सांगून उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणामध्ये न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच गर्ल्स कॉलेज गोंदिया तर्फे लावण्यात आलेल्या प्रदर्शनीकरिता प्रोफेसर श्रीमती खांडेकर यांचे आभार मानले. तसेच आज महिला न्यायालयात वा कोणत्याही क्षेत्रात कुठेही कमी किंवा मागे राहिलेल्या नाही. विविध क्षेत्रात महिलांच्या पुढाकारामुळे त्यांनी आपले व देशाचे नाव मोठे केले आहे.

         कार्यक्रमाला न्यायाधीश ए. एम. खान,  न्यायाधीश श्रीमती टी.व्ही. गवयी, न्यायाधीश श्रीमती एस. एस. साळवी, सरकारी वकील चांदवानी, ॲड. आरती भगत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालयातील कर्मचारी सारिका बेलेकर यांनी  केले तर उपस्थितांचे आभार राज्यश्री कडव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथील कर्मचारी तसेच एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया येथील विद्यार्थिनी यांनी मोलाचे योगदान दिले.

देवरी प्रकल्प कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

           गोंदिया, दि.9 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. आजची स्त्री सर्वच क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करतांना दिसुन येत आहे. महिलांचा सन्मान, आदर, करणे सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे.  आजच्या दिवशी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च, हा दिवस संपुर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो असे विकास राचेलवार यांनी सांगितले.

           या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन असेही म्हटले जाते. महिला विषयी आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी, तसेच महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक महिलांसाठी हा आजचा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असुन महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगीरीच्या स्मरणार्थ १९९० साली कोपनहेग येथे ८ मार्च, हा दिवस जागतीक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मांडला व तो पास झाला. बल्गेरिया व रोमानिया या देशांमध्ये हा दिवस मातृदिन म्हणून सुध्दा साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रकल्प कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपेश मांडे यांनी केले. जागतीक महिला दिनामिमित्त छाया गहलोत, नेहा गजभिये, ओमेश्वरी पुंडे तसेच वाय. एन. देशमुख प्रा. शिक्षक यांनी जागतीक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व उपस्थितांचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी एच. आर. सरियाम यांनी मानले.