“मराठीच्या अस्मितेसाठी साहित्यिकांनी एकत्र यावे.”-संमेलनाध्यक्ष,प्रा. डॉ. शोभाताई रोकडे

0
16

“गुरुकुंजात पहिले सातपुडा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.”

अमरावती:-साहित्यिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संवेदना बहुद्देशीय संस्था संचालित सातपुडा साहित्य परिषदेचे वतीने आयोजित पहिले राज्यस्तरीय सातपुडा साहित्य संमेलन 26 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील गुरुकुल आध्यात्म केंद्राच्या सभागृहात अतिशय उत्साहात पार पडले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम साहित्यिका प्रा.डॉ.शोभाताई रोकडे व स्वागताध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक व माजी सिव्हिल सर्जन श्री श्यामसुंदर निकम, उदघाटक म्हणून माजी शिक्षणाधिकारी श्री पंडितजी पंडागडे तर प्रमुख अतिथी म्हणून राजीवजी ठाकूर व गुरुकुल आध्यात्मचे संचालक श्री रवी मानव तथा संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गजानन काकडे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्रा.डॉ.शोभाताई रोकडे यांनी मराठी भाषेतून नव्या दमाचं साहित्य निर्माण होत असून अशीचं नवनिर्मिती होत राहण्यासाठी मराठी भाषेला अधिक समृद्ध करणे गरजेचे आहे.म्हणूनचं मराठी भाषेचा आदर आणि सन्मान व्हावा, यासाठी साहित्यिकांनी झटत राहावे असे आवाहन त्यांनी केले.
संवेदना बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित सातपुडा साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व नामांकित अशी संस्था असून,या संस्थेच्या वतीने वर्षभर विविध साहित्यिक,सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.त्याचाच एक भाग म्हणून पहिले सातपुडा साहित्य संमेलन रविवार २६ फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव अध्यात्म केंद्राच्या सभागृहात पार पडले.
संमेलन स्थळ ते समाधीस्थळ अशी ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली,यामध्ये विवेक राऊत,नितीन भडके,विलास कराळे,गजानन पाणबुडे यांनी रंग भरले,त्यानंतर संमेलनाचे उदघाटन,प्रतिमा पूजन,दीप प्रज्वलन, संकल्पगीत,स्वागतगीत,मान्यवरांचे स्वागता नंतर प्रमुख मान्यवरांचा थोडक्यात परिचय संस्थेचे सदस्य विशाल कन्हेरकर यांनी करून दिला.त्यांनतर संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक,सचिव सुयोग राजनेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेचा व संमेलनाच्या पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा घेतला.त्यानंतर सत्कार व पुरस्कार वितरण तथा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.यावेळी विविध क्षेत्रातील वीस मान्यवरांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मराठी साहित्यातील “भूमिनिष्ठ जाणिवा” या विषयावर श्री ज्ञानेश्वर रक्षक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिसंवादामध्ये डॉ.राजेश मिरगे,डॉ.राजेंद्र मुंडे यांनी मराठी साहित्यातील भूमिनिष्ठ जाणिवांचे विविध पैलू विशद करून साहित्यिक व रसिकांचे वैचारिक प्रबोधन केले. दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत प्रसिद्ध कवी व गझलकार श्री विष्णू सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे अतिशय देखणे व दर्जेदार कविसंमेलन पार पडले या कविसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री भाऊसाहेब थुटे व आबासाहेब कडू प्रामुख्याने उपस्थित होते.या कविसंमेलनामध्ये गजानन मते,विजय सोसे, नितीन वरणकार, संजय कावरे,रविंद्र जवादे,प्रमोद पंत,प्रशांत ढोले,जयश्री कोटगीरवार, विजय बिंदोड या मान्यवरांनी आपल्या बहारदार कविता सादर करून रसिक साहित्यिकांना चांगलेचं मंत्रमुग्ध केले.यानंतर झालेल्या गझल मुशायऱ्याने तर रसिकांना अगदीचं खिळवून ठेवले.या गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार अनंत नांदूरकर खलिश हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.विजया मारोतकर,विनय मिरासे, रजियाताई सुलताना प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यानंतर झालेल्या खुल्या कविसंमेलनापर्यंत साहित्यिक व रसिकांची कार्यक्रमाला चांगलीचं उपस्थिती होती. साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात संवेदना बहुउद्देशीय संस्थेतर्फे अध्यक्ष गजानन काकडे यांचे हस्ते संमेलनात विशेष सेवा देणाऱ्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.या भव्य राज्यस्तरीय सातपुडा मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक,संवेदना बहुद्देशीय संस्था अध्यक्ष गजानन काकडे,उपाध्यक्ष विशाल मोहोड,सचिव सुयोग राजनेकर,सहसचिव सारंग ताथोडे, कोषाध्यक्ष अजय अडीकने,सदस्य खुशाल गुल्हाने,विशाल कन्हेरकर,अंकुश वानखडे व गौरव कांडलकर तसेचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच संस्थापक,नगरसेवक अमर वानखडे, प्रशांत सुरोसे,रोशन ठाकरे,पवण खरासे,अनुप देशमुख,साक्षी पवार जान्हवी राऊत,नेहा वानखडे,सुमित उगेमुगे,सेजल फेंडर,समरीन सय्यद,अनिल वाघमारे प्रफ्फुल रामपुरे,अतुल तीखे,तिवसा तालुका काँग्रेसचे महासचिव गौरव ढोरे आदी मान्यवरांचे विशेष कौतुक होत आहे.