चिचगड-परसोडी दरम्यान मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

0
69

चिचगड,दि.९-देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या नऊ किलोमीटरवरील परसोडी वळणावर आज झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मृतकाचे नाव आदित्य देवराज कुंभरे(वय 20,रा.भरैगाव,ता.देवरी) असे आहे.सदर युवक मोटरसायकल क्रमांक एमएच 35 एडी ८३२३ ने जात असतांना हा अपघात घडला असून चिचगड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.अपघाताचा तपास पोलीस हवालदार ब्रिजलाल मरसकोल्हे करीत आहेत.