देवरी येथे महिला दिन साजरा

0
14

देवरी,दि.10 – देवरी येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार हे होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, पिया अशोक बनकर, मनोहर भाई पटेल विद्यालयाच्या प्रा. सुनंदा भुरे आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवर वक्त्यांनी यावेळी उपस्थित मुलींना समयोचित मार्गदर्शन केले. दरम्यान वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांचे मान्यवर पाहुण्याचे हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

प्रस्ताविक गृहपाल मीनाक्षी बढे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन प्रियंका राऊत आणि उपस्थितांचे आभार प्रतिमा उईके यांनी मानले. यावेळी वसतिगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.