Home विदर्भ देवरी येथे ‘महानायक बिरसा’ या महानाट्याचे सादरीकरण उद्या

देवरी येथे ‘महानायक बिरसा’ या महानाट्याचे सादरीकरण उद्या

0

देवरी,दि.१०-देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि यवतमाळ येथील कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘महानायक बिरसा’ या दोन अंकी महानाट्याचे सादरीकरण उद्या शनिवारी (दि.११) सायंकाळी ७ वाजता स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते, देवरी- आमगाव विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे, देवरीचे नगराध्यक्ष संजू ऊईके, गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, देवरी पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार, सभापती सविता पुराम, देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, रमेश ताराम, चेतन ऊईके,सहायक प्रकल्प अधिकारी हरिश्चंद्र सयाम, आदिवासी कर्मचारी संघटनेचे लोकनाथ तितराम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महानाट्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन प्रा.मधू दिहारी, अविरत सयाम, शामलाल मडावी, नंदू भोयर, युवराज कोल्हारे,टिकाराम मातवारे, दुधराम कुंभरे,सुभाष नरेटी,दिनेश सोडी,मधू टेकाम,नरेश प्रधान, सुंदरलाल ऊईके,मनोज गेडाम,रवी कळ्याम, डॉ. उमेश ताराम,बिसराम सलामे,दिलीप कुंभरे, विजय मडावी, शालू पंधरे, शारदा ऊईके,सुनिता गावळ,शीला मारगाये,सुषमा पंधरे यांनी केले आहे.

Exit mobile version