तिरोडा गोरेगाव तालुक्यातील रस्ते व पूल बांधकामाकरिता अर्थसंकल्पात १३२.९९ कोटींची तरतूद- आ. रहांगडाले

0
31

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून तिरोडा गोरेगाव तालुक्यातील रस्ते व पूल बांधकामाकरिता एकून १३२.९९ कोटींची कामे समाविष्ट झाल्याने विधानसभा क्षेत्रातील रस्ते व पूल बांधकामाची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इतर जिल्हा मार्ग रस्ते बांधकामाकरिता एकूण ७२.०५ कोटीची तरतुद करण्यात आली असून,चुरडी चिखली मंगेझरी सिमेंट रस्ता बांधकामाकरिता १०.०० कोटी, किंडगीपार गोंडमोहाडी सोनेगाव बेरडीपार रस्ता बांधकाम २.०० कोटी, धादरी सालेबर्डी भंबोडी खुरखुडी पांजरा रस्ता बांधकाम २.०० कोटी, करटी खु.पुजारीटोला करटी बु.बोरा रस्त्याकरिता २.०० कोटी, अर्जुनी सावरा पिपरिया बिहरिया करटी खु.मरारटोला रस्ता बांधकाम १.०० कोटी, सोनेखारी नवेझरी नांदलपार कोडेलोहारा रस्ता ४.०० कोटी, कवलेवाडा सोनेगाव नवरगाव बागळबंद रस्ता बांधकाम २.०० कोटी, चीरेखणी खैरबोडी रस्त्याचे मजबुतीकरण ९.०० कोटी, कुलपा नवेझरी रस्ता मजबुती करन व डांबरीकरण ७.०० कोटी,पुरगाव सुकाटोला रस्ता सुधारणा करणे १३.५० कोटी , डव्वा गणखैराटोला रस्त्याची सुधारणा करणे ९.०० कोटी, मेघाटोला सिलेगाव रस्त्याची सुधारणा करणे ६.३०० कोटी, मेघाटोला भूताईटोला रस्त्याची सुधारणा करणे ९.०० कोटी, तसेच प्रमुख जिल्हा मार्गाकरिता ५०.९४ कोटींची तरतुद करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरणी काटी तेढवा धापेवाडा रस्ता मजबुतीकरन व पूल बांधकामाकरिता ६.४० कोटी, कुडवा रतणारा जोडणारा बोदलकसा इंदोरा एकोडी रस्ता मजबुतीकारणाकरिता ६.२४ कोटी,तिरोडा बोदलकसा गोरेगाव ठाना रस्ता मजबुतीकारणाकरिता २०.८० कोटी, पलाडी कोका करडी बोपेसर रस्ता मजबुतीकरन ४.५० कोटी,घोगरा मुंडीकोटा गोरेगाव ठाणा रस्त्यावर पूल बांधकामाकरिता २.०० कोटी, किंडगीपार पांगडी भानपूर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरन २.५० कोटी, कारंजा फुलचूर तुमखेडा झांजीया भडंगा रस्ता मजबुतीकरन ७.५० कोटी तसेच आदिवासी ५०५४ अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते मजबुतीकरणाकरिता १०.०० कोटींची तरतूद करण्यात आलेली असून यामध्ये प्रामुख्याने कोडेबर्रा कोडेबर्रा बोदलकसा एप्रोच रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, मंगेझरी पीएचसी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रुस्तमपुर खमारी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रुस्तमपुर खडकी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रुस्तमपुर पिंडकेपार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मंगेझरी-घोटी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सोनेखारी- मुरमाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सोनेखारी- खेडेपार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सितेपार नवेझरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सितेपार कुलपा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, लोणारा नांदलपार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रुस्तमपुर खमारी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रुस्तमपुर पिंडकेपार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मंगेझरी-घोटी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सोनेखारी-नवेझरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, चोरखमारा कोसमतोंडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, आलेझरी सुकडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, आलेझरी बालापुर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, चोरखमारा साकोली फाटा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, चोरखमारा पिटेझरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या सर्व कामांकरिता प्रत्येकी ५०.०० लक्ष असा एकूण १३२.९९ कोटी रुपये रस्ते व पूल बांधकामाकरिता मंजूर करण्यात आले असल्याने तिरोडा गोरेगाव तालुक्यातील रस्ते दर्जोन्नत होणार आहेत या भरीव निधी मंजूर केल्याने आमदार रहागंडाले यानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.