गोंदिया जिल्हा कंत्राटी कर्मचारी संघटनेचा राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपाला पाठींबा

0
49

गोंदिया,दि.15ः- जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 14 मार्चपासून राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून ही सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत.या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी संघटनेने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.त्यासंबधीचे निवेदन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांना दिले.हे कंत्राटी कर्मचारी संपात प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांनी काळ्या फिती लावून काम करीत संपात सहभाग नोंदवला आहे.नवीन पेन्शन योजना रद्द करणे, प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन, सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा, सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा, निवृत्तीचे वय ६० करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे.