गोंडीटोला येथील कार्डधारकांचा हनवते स्वस्त धान्य दुकानादाराकडून राशन घेण्यास विरोध

0
28

गोंदिया- तालुक्यातील घिवारी (गोंडीटोला) येथील राशन अन्न धान्य दुकानदाराकडून कमी राशन व गैरवर्तणुकपणे व्यवहार करीत असल्याने तक्रारीनुसार तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार दूकान रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गोंडीटोला येथील राशन कार्ड धारकांना मौजा गर्रा येथील स्वस्त धान्य दुकानदार .छगन न्यायखोर यांच्याकड़े जोडण्यात आले होते.त्यांच्याकडून योग्यप्रमाणे राशन अन्न धान्याचा वाटप होत होता. सध्या परिस्थिती मध्ये त्यांना पुन्हा दूकान सूरू करण्याचे आदेश देण्यात आले.त्यांच्या दुकानाला अनेकदा रद्द करण्यात आले असून कायमस्तव का रद्द करण्यात येत नाही आहे असे प्रश्न कार्डधारकांनी प्रशासनाला केले आहे.
गावातील १३७ राशन कार्ड धारकांची मागणी आहे की, श्री.हनवते राशन अन्न धान्य दूकानदाराकडून हटवून त्यांना छगन न्यायखोर राशन अन्नं धान्य दुकानदार गर्रा खुर्द यांच्याकड़े जोडण्यात यांवे अशी मागणी केली आहे.याबाबत स्वाक्षरीच्या माध्यमातून हमी दिली आहे. तसेच खोट्या सही केल्याचे आरोप तक्रारदारावर करण्यात आले होते.त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी सर्व कार्डधारकांना सभेच्या माध्यमातून विरोध करण्याकरीता बोलविले असून त्या अनुषंगाने सर्व नागरिक कार्ड धारक उपस्थित होते. परंतु तहसीलदार गोंदिया हे त्या दरम्यान उपस्थित झाले नाही.