सुसंस्कृत समाज निर्माण करा:- भदंत नागदिपंकर महास्थवीर

0
21

अर्जुनी मोरगाव,दि.20ः विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम समता सैनिक दल करतो. समता सैनिक दलाच्या पुर्वजांनी जो लढा दिला तो देशात असलेल्या विषमते विरुद्ध. आज आपण सर्वांनी बंधु- भावाने आदराने जिवन जगलो पाहिजे. आपन सैनिक म्हणून आपला घर कसा सुसंस्कृत होईल. आपला गाव कसं सुसंस्कृत होईल याकडे प्रत्येक सैनिकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असे प्रतिपादन पुज्य भदंत नागदिपंकर महास्थवीर यांनी केले.
प्रसन्न सभागृह अर्जूनी मोर येथे १९ मार्च २०२३ ला समता सैनिक दलाच्या ९६‌ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघान दानेश साखरे सभापती नगरपंचायत अर्जूनी मोर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पुज्य भदंत नागदिपंकर महास्थवीर राष्ट्रीय मार्गदर्शक समता सैनिक दल हे होते प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ युवराज मेश्राम, पृथ्वी मोटघरे राष्ट्रीय सहसचिव समता सैनिक दल
प्रमुख उपस्थिती डॉ. अजय अंबादे जी.ओ.सी. गोंदिया, सुरेखा टेंभुर्णे असिस्टंट जी.ओ.सी. , आकाश ठवरे, मंजुषा वासनिक, प्रतिमा देशपांडे, शशीकला सांगोळकर, हेमचंद लाडे, मनोज बडोले, कुंती नंदेश्वर, ललीत भैसारे, नलीनी मोटघरे, प्रियंका मेश्राम, सहादेव टेंभुर्णे, हेमचंद लाडे, भारती लेंडारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या ध्वजाला सलामी देऊन बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत वडेगाव रेल्वे शाखेच्या लेझीम पथकाने करण्यात आली.
प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की संविधानाचा प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या प्रमाणे आपन शासनकर्ती जमात तयार केले पाहिजे. समता सैनिक दलाच्या सैनिकांची संख्या कसी वाढेल याकडे सर्व सैनिकांनी लक्ष द्यावे. असे प्रतिपादन युवराज मेश्राम सर यांनी केले.
समता सैनिक दल हि शील शौर्य बलीदानाची कार्यशाळा आहे. आपन समता सैनिक दलासबोत खंबीर पणे सबोत आहे असे प्रतिपादन दानेश साखरे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन मिथुन मेश्राम माजी जी.ओ.सी. यांनी केले. प्रास्ताविक अजय अंबादे यांनी केले तर आभार सुरेखा टेंभुर्णे यांनी मानले कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल गोंदिया जिल्हा च्या वतीने करण्यात आले.