नवतेजस्विनी प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ…

0
10
  • टसर, पितळची भांड्यांसहीत महिला बचत गटांनी तयार केलेली

     तीसपेक्षा अधिक उत्पादने

  • खवैय्यांसाठी खास आकर्षण

भंडारा, दि. 25 :  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तीन दिवसीय नवतेजस्विनी प्रदर्शनाचा आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याहस्ते ऑफिसर क्लबच्या प्रांगणात  थाटात शुभारंभ  झाला. यावेळी व्यासपिठावर जिल्हा  महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर, माविमचे विभागीय समन्वय अधिकारी राजू इंगळे, दिनशॉचे उपमहाव्यवस्थापक श्री. उपाध्याय, जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ, भंडारा माविमचे जिल्हा समन्वयक प्रदिप काठोडे उपस्थित होते.

उदघाटनानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी महीला बचतगटांच्या स्टॉलची पाहणी केली व बचत गटाच्या महिलांशी बोलुन उत्पादनांची माहिती घेतली. विविध शासकीय विभागांचे 9 स्टॉल आणि बचत गटांच्या 41 स्टॉलला त्यांनी यावेळी भेट दिली. महिली बचत गटांनी उत्तम पद्धतीने त्यांच्या उत्पादनांची मार्केटींग केले पाहिजे.  व आकर्षक पॅकेजिंगवर काम करावे. उत्पादनाच्या पॅकेजिंगवर संपर्क क्रमांक द्यावा. महिला बचत गटाच्या एका सदस्याला किमान दहा हजार रूपये महिन्याचे उत्पन घेतले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.काठोडे यांनी 1998 पासून जिल्ह्यात सूरू झालेल्या माविमच्या बचत गटांचा प्रवास उलगडून दाखविला. तसेच या प्रदर्शनाच्या आयोजनामागची भुमिका मांडली.  महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणा-या जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 2013-14 या वर्षासाठी सौ. रहमत बी. मिर्जा, 2016-17 या वर्षासाठी प्राजक्ता पेठे तर 2017-18 यावर्षासाठी  सिमा बन्सोड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारामध्ये 10 हजार रूपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व मानचिन्ह यांचा समावेश होता.

पुढील दोन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून भंडारावासीयांनी या प्रदर्शनाला आर्वजुन भेट द्यावी, असे आवाहन माविमचे जिल्हासमन्वयक श्री. काठोडे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज केवट तर आभार प्रदर्शन भावना डोंगरे यांनी केले.