कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक;जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मदत

0
22
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा
वाशिम दि.३० – जिल्ह्यातील एकूण सहा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.या निवडणूककरिता नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.परंतु अनेक उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहण्याची वेळ येईल.ही बाब शासनस्तरावर लक्षात आल्याने या निवडणूकीत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास बारा महिन्याची मुदतवाढ देण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत.तरी संबंधित उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करण्यास शासनाने मुभा दिली आहे.शासनाच्या या निर्णयामुळे राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना फायदा होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले आहे.