राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तुमसर शहरात विविध ठिकाणी पाणी प्याऊचे उद्घाटन

0
12
तुमसर:महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या   102 वी जयंती चे औचित्य साधून इंजि. सागर गभने यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तुमसर शहरात विविध ठिकाणी धर्मार्थ पाणी प्याऊ चे उद्घाटन करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात तापमान 40° च्या वर आढळतो. तुमसर येथील तहसील कार्यालय येथे बाहेर गाऊन लोक येत असतात व उन्हाळ्यात त्यांना पाण्याची कमतरता भासत असते बाहेर जाऊन ये जा करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास होऊ नये या उद्देशाने तहसील कार्यालया समोर पाणी प्याउ सुरू करण्यात आले.
तसेच शहराच्या मध्य ठिकाणी असलेल्या जुना बस स्टॉप चौकामध्ये बाहेर गावचे प्रवासी ये-जा करतात व शालेय विद्यार्थ्यांच्या त्या परिसरातून ये-जा करतांनी आढळतात त्यांच्या सोयीसाठी जुना बस स्टॉप चौक मध्ये सुद्धा पाणी उभारण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष इंजि.सागर गभने यांनी सांगितले की राष्ट्रवादी युवक काँग्रेस हा नागरीकांना त्यास होऊ नये मनुन नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहतो व पुढेही समाज सेवेचं काम करत राहू असे वक्तव्य केले.
यावेळी खा.मधुकर कुकडे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष यासिन छवारे, युवा शहराध्यक्ष इंजि. सागर गभने,मुकेश मलेवर,विजय कूंजेकर, राहुल रनदिवे,संकेत गजबिये,शेखर तीबुडे,महेश नींमजे,अनुप तिडके, मोनु भुरे, बालेस्वर लांजेवार,फिरोज शेख, नवशाद शेख,विकास मानवटकर,मनीष बोंद्रे,आयुष कुंजेकर,अनुज तिडके,रोहन बालपांडे,प्रवीण भुरे उपस्थित होते.