वैद्यकीय महाविद्यालयातील धूळखात असलेले साहित्य उपयोगात आणा-ओबीसी जनमोर्चा

0
17

यवतमाळ,दि.03ः- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अति विशेष उपचार विभाग-सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अद्यावत सोईनी परिपूर्ण सर्व विभाग सुरू करण्याच्या दृष्टीने, नवीन इमारत बांधून झालेली आहे. या इमारतीमध्ये हृदयरोग विभाग, नवजात शिशु विभाग, मज्जातंतू विभाग, मज्जातंतू शल्य क्रिया विभाग, किडनी विकार / मूत्र विभाग अशी जवळजवळ सात-आठ विभाग सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने मान्यता दिल्याचे कळते. त्याकरिता विविध विभागांसाठी लागणारी अनेक उपकरणे विकत घेण्यात आलेली आहेत आणि त्याला दोन वर्षाच्या वर अधिक काळ लोटलेला असताना अजूनही एकही विभाग सुरू झाला नाही. त्यामुळे सदर विभाग तात्काळ सुरू करावे अशी मागणी ओबीसी जन मोर्चा व भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेने केलेली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून विकत घेतलेली सगळी उपकरणे धूळ खात पडलेली आहेत. उपकरणांचा वेळेत उपयोग न केल्यास सर्व उपकरणे भंगारात जाण्याची शक्यता आहे. सर्व उपकरणे कुचकामी ठरावित वाया जावीत व दुरुस्ती करणे अशक्य होणे अशी परिस्थिती निर्माण व्हावी,हीच उपकरणे पुन्हा विकत घेण्याची परिस्थिती निर्माण व्हावी, याची शासन वाट पाहत आहे काय ?असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील सर्व विभाग अद्ययावत सोयींनी परिपूर्ण करून ते जनतेच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि पालकमंत्री यांना करण्यात आलेली आहे, याकरिता माननीय जिल्हाधिकारी मार्फत भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे ,ओबीसी जन मोर्चा उपाध्यक्ष विलास काळे, मुख्य सल्लागार गोविंद चव्हाण ,मायाताई गोरे , सुनिता काळे , प्रा.सविता हजारे कमलताई खंडारे , माधुरी फेंडर. शशांक केंडे, वासुदेवराव खेरडे, विवेक डेहंनकर, अशोक काळमोरे, अशोक. मोहुर्ले, प्रकाश डब्बावार , संतोष झेंडे ,अनिल जयसिंगपुरे , पुरुषोत्तम ठोकळ, शशिकांत लोळगे, नरेंद्र कावलकर ,सुनील महिंद्रे, किशोर कावलकर, बंडू राऊत,उत्तमराव खंदारे, यशवंत इंगोले ,अरुण कपिले यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.