39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांकरिता नोंदणी  शिबिर उत्साहात

दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांकरिता नोंदणी  शिबिर उत्साहात

0
42

blank

वाशिम,दि.१६ – सामाजिक न्याय पर्वानिमित दिव्यांग प्रवर्गांना आवश्यक असणाऱ्या कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र वाशिम आणि महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद यांच्या संयुक्त वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वाशिम येथे १५ एप्रिल रोजी नाव नोंदणी व मोफत तपासणी शिबिर उत्साहात आयोजित करण्यात आले.
           या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ३५ अस्थिव्यंग,१८० मतिमंद, २०७ मूकबधिर आणि २४ अंध  दिव्यांग लाभार्थ्यांची शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन अधीक्षिका कल्पना ईश्वरकर, समाज कल्याण निरीक्षक अश्विनी राऊत,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रतिनिधी व कवठा येथील आधार निवासी मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा पुंड यांच्या हस्ते करण्यात आले.
      आयोजित शिबिरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंतर्गत असणाऱ्या सर्व योजनांची माहिती समाज कल्याण निरीक्षक अश्विनी राऊत यांनी दिली. श्रीमती ईश्वरकर यांनी युडीआयडी कार्ड नोंदणी आणि त्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी दिव्यांग लाभार्थी,त्यांचे नातेवाईक आणि समाज कल्याणचे कर्मचारी उपस्थित होते.

blank