गंगाबाईत गर्भवतीचा मृत्यू

0
8

गोंदिया : अल्प आजारामुळे रूग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती महिलेचा उपचार घेताना बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सोमवारी पहाटे ५.३0 वाजतादरम्यान मृत्यू झाला. मनीषा सुमित सतिसेवक (२५) रा. बघोली/काटी असे मृत पावलेल्या गरोदर महिलेचे नाव आहे.
गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी शासनाने विविध योजना अमंलात आणल्या. परंतु या योजना राबविणारे अधिकारी कर्मचारी गर्भवतींकडे लक्ष देत नसल्याने त्यांचे हाल होतात. मनीषाच्या शरीरात फक्त ४ ते ५ ग्रॅम रक्त होते. त्यातच तिला आजारही होता. गावातील आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तिला उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. रक्त चढविण्यासाठी रक्त मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना मनीषाचा मृत्यू झाला.