स्वतंत्र विदर्भ राज्य होणारच-अ‍ॅड.अणे

0
8


गोंदिया,दि.12:महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीपासुन आजपर्यंत विदर्भावर फक्त अन्यायच करण्यात आला असून त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात विदर्भ मागासलेला आहे.विदर्भाचा विकास करायचा असेल तर वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहीजे.वेगळा विदर्भ ही काळाची गरज असुन विदर्भ आंदोलनाला विदर्भातील ९० टक्के जनतेचा पाठींबा अाहे.फक्त काही सत्तापिपासू राजकीय नेत्यांनाच वेगळा विदर्भ नको असे वाटत असले तरी जनतेचा विदर्भ राज्याप्रती असलेला जनमत बघता वेगळा विदर्भ राज्य होणारच असा विश्वास राज्याचे माजी महाधिव्वक्ते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.तसेच त्यांनी मराठवाड्यासंदर्भात बोलतांना सांगितले की आज ते काही मराठवाड्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली त्यास त्याभागातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण दोषी असल्याचे म्हणाले.आपल्याकडे पाण्याची समस्या नसली तरी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आहे.पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षांचे मळे फुलविण्यासाठीचा पाणी जायकवाडी धरणातून सोडण्याचे आदेश सवोर्च्च न्यायालयाने दिल्यानंतरही सोडण्यात आले नव्हते यावरुन आपणास तेथील राजकारणाचा अनुुभव महाधिव्कत्ता असतांना अनुभवायास मिळाल्याचे ते म्हणाले.ते गोंदिया येथील पोवार समाज सभागृहा आयोजित वेगळ्या विदर्भाच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होेते.यावेळी अॅड.टि.बी.कटरे,अर्चना नंदागळे,पराग तिवारी,सुनिता कटरे,छैलबिहारी अग्रवाल,रमेश ढोमणे,स्वाभीमान संघटनेचे जितेश राणे,निलम हलमारे,नगरसेवक महेंद्र निबांर्ते,माजी आमदार मधुकर कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.