आजच्या काळात सर्व समाजासाठी सामूहिक विवाह आवश्यक – जिल्हादंडाधिकारी चिन्मय गौतमारे

0
17

बौद्ध सामूहिक विवाहात 12 जोडपी विवाहबंधनात
गोंदिया-भीमघाट स्मारक समिती गोंदिया व विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मरारटोली येथे बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये 12 जोडपी विवाहबंधनात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे जिल्हादंडाधिकारी चिन्मय गौतमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या काळात सर्व समाजासाठी सामूहिक विवाह होणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सामाजिक ऐक्य मजबूत होते. आणि वरील कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित केल्याबद्दल आयोजन समितीचे अभिनंदन करण्यासोबतच नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भीमघाट स्मारक समिती गोंदिया आणि विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ने पहिलादाच बौद्ध सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला होता. सामुहिक विवाहाचे समिती चे अध्यक्ष घनश्याम पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन समाजातील 12 जोडपी विवाह बंधनात बांधली गेली.

सामुहिक विवाहात प्रमुख रूपाने जिल्हादंडाधिकारी चिन्मय गोतमारे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक करणकुमार चौहान, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे प्रमुख पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत डोंगरे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम गोंदिया सुनील बडगे, माजी अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती सतीश बनसोड, प्रदीप ठवरे, गज्जू नागडवणे, सुनील भालेराव, विकास सेंडे, अजय चौरे, महेंद्र मेश्राम, सुशीला भालेराव, दिनेश रंगारी, सुरेंद्र बोरगावकर, के. , प्रशांत मेश्राम डॉ राजेंद्र वैद्य , डॉ सनम देशभ्रतार , डॉ योगेश सोनारे , डॉ मोहित गजभिये , विजय रगडे , विनीत सहारे , अशोकबेलेकर, जितेंद्र बंटी पंचबुद्धे उपस्थित होते. कार्यक्रमात भीम घाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे, उपाध्यक्ष राजा बनसोड, रंजना मेश्राम, किशोर मेश्राम, रोशन जांभुळकर, महेंद्र मेश्राम, कुंदन चौरे, सुनील जाभुडकर, वनिता बनसोड तसेच सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अमित भालेराव, विलास राऊत, श्याम चौरे आदी उपस्थित होते.

समिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पानतावणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भीमघाट स्मारक समिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यादरम्यान समाजातील दुर्बल घटकातील लोकांना त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना लग्नासाठी कर्जे द्यावे लागतात. समाजातील सक्षम व्यक्तींच्या मदतीने दुर्बल घटकांच्या मदतीसाठी 4 महिन्यांपूर्वी सामूहिक विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये पहिल्या वर्षी या कार्यक्रमात 12 जोडपी विवाहबद्ध होत आहेत. आणि यापुढील काळात हे काम भव्य पध्दतीने करण्यासोबतच डिसेंबर महिन्यात परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी करण चौहान यांनी सर्व नवदाम्पत्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासमोर दीपप्रज्वलन करण्यात आले. आणि 12 जोडप्यांना प्रत्येकी जीवनावशक संपूर्ण अलमारी कुलर, दिवाण, ड्रेसिंग, मिक्सर मशीन, टीव्ही या प्रमाणे संपूर्ण साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. यासोबतच सर्व नवदंपत्याला 25 हजार रुपये रोख सुद्धा देण्यात आले. समितीतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हर्षपाल रंगारी, रविकांत कोटांगळे, मिलिंद गणवीर, प्रफुल्ल भालेराव, सुनील मेश्राम, बसंत गणवीर, प्रवीण बोरकर, रवी भालाधरे, अनिल डोंगरे, जितेंद्र सतीसेवक, अमर राऊत, आकाश यांनी विशेष सहकार्य केले तसेच इतर सहाय्यक सदस्यांनीही मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन श्याम चौरे यांनी तर प्रास्ताविक अमित भालेराव यांनी केले.