पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना  ८ मे रोजी साहित्य वाटप कार्यक्रम

0
7

गोंदिया,दि.7 : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर परिषद प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ८ मे २०23 रोजी सकाळी 11 वाजता पवार बोर्डींग, पुनाटोली, गोंदिया येथे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे राहणार आहेत. या कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील संपन्न झालेल्या मोजमाप शिबिरामध्ये पात्र ठरलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य साधने व उपकरणे वितरीत करण्यात येणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी कळविले आहे.

       भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या मार्फत गोंदिया जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना एडीआयपी योजनेंतर्गत मोफत साहित्य साधने व उपकरणे पुरविणेसाठी तालुकानिहाय मोजमाप शिबीरांचे आयोजन माहे सप्टेंबर २०२२ मध्ये करण्यात आले होते. सदर मोजमाप शिबीरामध्ये गोंदिया जिल्हयातील तालुकानिहाय एकुण १३७८ दिव्यांग लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तिरोडा १६१, गोरेगाव ३०९, देवरी ०३, आमगाव २५, सालेकसा १३, अर्जुनी/मोरगाव १९२, सडक अर्जुनी २२१ व गोंदिया ४५४ अशा एकूण १३७८ दिव्यांग लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.

        मोजमाप शिबीरामध्ये पात्र झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची साहित्य वितरणासाठी निवड करण्यात आलेली असून तालुकानिहाय शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ०८ मे २०२३ रोजी खासदार सुनिल मेंढे यांचे अध्यक्षतेखाली तसेच मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, महा. राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत साहित्य वितरणाचा कार्यक्रम पोवार बोडींग, कन्हारटोली, गोंदिया येथे संपन्न होणार आहे. निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणेबाबत दिनांक, स्थळ व वेळ कळविण्यात आलेले आहे. करिता साहित्य साधने वाटप करणेसाठी निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गणविर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी केले आहे.