येरंडी /दर्रे इथे पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन

0
13

अर्जुनी मोर ता.15:-तालुक्यातील येरंडी /दर्रे येथे रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अर्जुनी /मोर विधानसभा मतदार संघांचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते हे भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, सरपंच करणदास रक्षा,माजी सदस्य किशोर तरोने,राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, शाखा अभियंता इंजि.अंकित अग्रवाल उपस्थित होते.सुमारे एक कोटी 93 लाख रुपये खर्च करून ही योजना सकरण्यात येणार असून यामुळे परिसरातील येरंडी /दर्रे, पवनी /धाबे, कान्होली, रामपुरी, येलोडी आणि जांभळी आदि गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येईल अशी आशा गावकऱ्यांनी वर्तविली आहे.