गोठणगाव जि.प. क्षेत्रातील‌ जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन

0
16

अर्जुनी-मोरगाव : जि.प. उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या  कामाचे भूमिपूजन झाले.

यात मौजा गोठणगाव २७३ लक्ष रु, येरंडी दर्रे १९३ लक्ष रू, मौजा खोली २२५ लक्ष, मौजा पांढरवाणी ६३.९३ लक्ष रु, गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. महिला सबलीकरण व पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यापासून मुक्त करण्यासाठी शासनस्तरावर हर घर जल हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हाच उदेश डोळ्यासमोर ठेवून इंजि यशवंत गणविर यांनी गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची कामे खेचुन आणली. गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्र अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल नक्षलग्रस्त क्षेत्र आहे. गोंदिया जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून हा क्षेत्र विकासापासून कोसो दूर आहे, परंतु यावेळी सुजाण सदस्य या क्षेत्रात लाभल्याने क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली आहे.

“पाणी हेचि जीवन”, मानवी जीवन जगत असताना पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठिच अतिदुर्गम भागात वसलेले निसर्गरम्य डोंगराळ व पर्यटनासाठि प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील माता भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असे, त्यांची ही पायपीट दूर व्हावी यासाठी सतत शासन दरबारी सतत पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांची कामे खेचुन आणली व त्याच कामांचा भुमिपूजन सोहळा पार पडला.

सदर भूमिपूजन सोहळ्याला पं.स. उपसभापती होमराज पुस्तोडे, पं.स. सदस्य आम्रपाली डोंगरवार, पं.स. सदस्य चंद्रकला ठवरे, माजी जि.प. सदस्य किशोर तरोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी जि.प. सदस्य रतिराम राणे, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता अंकीत अग्रवाल, गोठणगावचे सरपंच संजय ईश्वार, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य रतिराम कोडापे, सुनंदा काटेंगे, भुमिका कराडे, कविता परतेकी, पुनम साखरे, निर्मला इश्वार, येरंडी दर्रे येथे सरपंच करणदास रक्षा, उपसरपंच कमल मिरी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष भोयर, जिवन कुंभरे, रोजगार सेवक संतोष जुगनाके, मौजा खोली व पांढरवाणी येथे सरपंच रंजना वाटगुरे, उपसरपंच दयाराम पाटील लंजे, ग्रामपंचायत सदस्य वनिता नागपुरे, चंद्रभान टेंभुर्णे, संजय खरवडे तथा प्रत्येक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.