मुरकुटडोह येथे पहिल्यांदा पोचणारे मंत्री ठरले मुनगंटीवार

0
14

गोंदिया(खेमेंद्र कटरे) दि.20 –राज्याच्या अतिपूर्वेकडे असलेला जिल्हा.जिल्ह्याची सीमा ही मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे.या दोन्ही राज्याच्या सीमा आणि गडचिरोली जिल्ह्याचा सीमा भाग हा जंगलव्याप्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल  आणि नक्षलदृष्टया संवेदनशील असल्यामुळे गोंदिया  जिल्हा नक्षलग्रस्त म्हणुन ओळखला जातो.त्यातच देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील असलेल्या मुरुकुटडोह, दंडारी, दलदलकुही आणि धनेगाव येथे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पोचणारे मंत्री ठरले आहेत.त्यांनी येथे नक्षलचळवळीवर आळा घालण्याकरीता तयार करण्यात आलेल्या आऊटपोस्टच्या लोकार्पणानंतर ग्रामस्थांशी संवाद साधून  विविध विषयांवर चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

जिल्हा निर्मितींनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पहिल्यांदा सडक मार्ग तयार झाल्याने त्याठिकाणी जिल्हयातील आरोग्य यंत्रणेसह अन्य यंत्रणा कशाप्रकारे दक्ष राहून काम करीत आहे हे बघण्यासाठी पहिल्यांदा पोचणार्या जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या ठरल्या.विशेष म्हणजे जुर्ले 2020 रोजी मटाने पहिल्यांदा ही गावे मुख्य मार्गाने जोडली गेल्याच्या वृत्तासोबतच काही समस्याही जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या होत्या.

प्रशासनाच्या वतीने जिल्हयातील अतिदुर्गम,आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील भागात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या व शिक्षणाच्या सुविधा,सार्वजनिक वितरण व्यवस्था, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, घरकुल योजना, शालेय पोषण आहार आणि अन्य केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना आणि नागरिकांना मिळत आहे किंवा नाही याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार,नक्षल पोलीस उपमहासंचालक संदिप पाटील,खासदार अशोक,सहा.जिल्हाधिकारी अनमोल सागर ,पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांनी मुरकूटडोह व दंडारी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.