राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे पथसंचलन 29 मे रोजी शहरातील मुख्य मार्गाने झाले. सायंकाळी सिंधी शाळेच्या मैदानातून पुर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन सुरु झाले ते भवानी चौक, मोटवानी चेंबर, इसरका भवन चौक, दुर्गा चौक, सराफा लाईन, गोरेलाल चौक, गांधी चौक, चांदणी चौक, शंकर चौक मार्गे लिटिल वुड्स विद्यालयात समापण करण्यात आले.
यावेळी पथसंचलनाचे निरीक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भिड़े, अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेन्द्र ठाकुर, क्षेत्रीय संपर्क प्रमुख विजय देवांगन, जिला संघचालक लीलाराम बोपचे, सर्वाधिकारी श्याम पत्तरकिने, वर्ग कार्यवाह दत्ताजी बहादुरे, नगर संघचालक मिलिंद अलोणी,
नगर सह संघचालक डॉ. मुकेश येरपुडे यांनी केले.