पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मोहाडीतील कर्तबगार महिलांचा सत्कार

0
18

गोरेगाव,दि ३१ मे-तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रम निमित्त शासननिर्णयानुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संध्या सुनिल बघेले व पुनम योंगेंन्द्र बिसेन या कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र चौरागडे होते.पुरस्कार वितरण जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी गोरेगाव बाजार समितीचे संचालक यु.टी.बिसेन,तन्टामुक्त गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, ग्रामपंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले,वाय.एफ.पटले,आर.एफ.पारधी,कमलेश पटेल,चुळामन पटले, शिवराम मोहनकार,अंगणवाडी सेविका मंगला चौव्हाण, निर्मला भोयर,बघेले बाई, कविता चाचेरे,ललिता कावडे आदी उपस्थित होते.संचालन व आभार ग्रांम पंचायत सचिव पी बी टेंभरे यांनी केले.