तिगांव येथे पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सन्मानाने 8 महिलांचा सत्कार

0
27

आमगाव -तालुक्यातील ग्राम पंचायत तिगांव येथे पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सन्मान सोहळा जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच डॉ.के.जी.तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथि म्हणुन संदीप तिरेले उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य अशोक कटरे, दिनेश बोपचे, कुंदाताई शहारे, नेहाताई टेंभुरणीकर, प्रियंका डोंगरे, प्रमीलाताई बोपचे, ग्रामसेवक कुणाल मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणार्या आशाताई मेश्राम, संगीता दोनोड़कर, गायत्री कटरे, रेवनताई पटले, पंचशीलाताई पटले, वंदनाताई मेश्राम, डिलेश्वरी पटले, रामवंता सोनकनेवरे यांचा शाल, श्रीफल, प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील बंधु भगीणी उपस्थित होते.कार्यक्रमाचे मंच संचालन जयेन्द्र तुरकर यांनी केले तर आभार प्रशांत तुरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी सुनीता पारधी, धनपाल कटरे व मंगेश मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.