दवडीपार ग्रामपंचायतीने केला गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार

0
16

गोरेगाव,दि ३१ मे-तालुक्यातील दवडीपार ग्रामपंचायत येथे आज 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त महिला बाल विकास व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दुर्गेश्वरी नरेंद्र बिसेन व जयकला संजय बोपचे यांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं.स.सदस्य डॉ.एस.के.कटरे होते.पुरस्कार वितरण सरपंच बि.एम.कटरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणुन उपसरपंच साहेबलाल बिसेन,सदस्य कुवरलाल कटरे,सदस्या सौ.सुनिताबाई कटरे,सौ.सुनिताबाई बिसेन,सौ.दिपकलाबाई पटले,पोलीस पाटील सौ.दीपमालाताई नांदगाये,सहाय्यक शिक्षक अरुण कटरे,अंगणवाडी सेविका सौ.मोतनबाई बिसेन,सौ.गिताबाई राऊत, सौ.द्रोपदीबाई बिसेन,आशा सेविका सौ.सीमाताई सोनवाणे,संगणक परिचालक गौरीशंकर पटले,कर्मचारी नीलकंठ कोल्हटकर तसेच सौ.जयशीलाबाई नांदगाये आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.बिसेन सर यांनी राजमॉता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्य वर आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे आभार मानले.