बटाना येथे महिलांच्या कर्तुत्वाला सलाम,पारितोषिक देऊन केले सत्कार

0
27

कामठा/गोंदिया (ता.1)- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील बटाणा येथे गावात उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या दोन महिलांचे बुधवारी (ता.31) येथील ग्रामपंचायत भावनात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रंजीता रहांगडाले, उपसरपंच विनोद येडे, ग्रामसेवक ठाकरे, ग्रा.पं.सदस्य भीमलता बनसोड, अशा नेवारे, टिकेश्वरी बिसेन, अंगणवाडी सेविका लता बिसेन, झनुका चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र रामटेके, राजेश रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी मागच्या वीस वर्षांपासून गावात महिला बचतगट चळवळीच्या माध्यमातून महिलांना साक्षर व आत्मनिर्भर बनविण्यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या अनिता अरविंद रामटेके तसेच गरोदर महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या प्रसूतीच्या काळात त्यांना मदत करणाऱ्या कौतिका शालिकराम रामटेके यांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पाचशे रुपये देऊन सत्कार करण्यात आला. सदर महिलांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शोभाबाई रामटेके, सुनंदा बनसोड, किरण उके,चंद्रकला नंदागवळी,रजनी चव्हाण, हर्षा हरिनखेडे, रजनी श्यामकुवर, उषा गजभिये, शीना बन्सोड,मेघा रामटेके यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाची प्रास्ताविका ग्रामसेवक ठाकरे यांनी मांडली तर आभार विनोद येळे यांनी मानिले.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी ग्रा. प. कर्मचारी विजय लांजेवार, उमेश बागडे यांनी सहकार्य केले.