” शासन आपल्या दारी ” अभियानात आरोग्य विभागाची वारी

0
20

गोंदिया-राज्य शासनाने नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात  शासन आपल्या दारी  महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून गोंदिया जिल्हयात सुद्धा जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील प्रत्येक तालुक्यातील गावात  शासन आपल्या दारी  उपक्रमाच्या माध्यमातून शिबिरे आयोजित करण्यात येत असून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.
आरोग्य विभागाने सुद्धा  शासन आपल्या दारी  अभियानात आरोग्याच्या विविध योजना, कार्यक्रम व विविध आजारावर प्रतिबंधात्मक उपयोजनाची माहिती गाव पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.
दि 1 जुन रोजी तालुका प्रशासन सडक अर्जुनीच्या पुढाकाराने मौजा डव्वा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डव्वा येथे  शासन आपल्या दारी  उपक्रम अभियान राबविण्यात आला .आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा येथील चमूने जनजागृती स्टॉल लावून आरोग्य विभागाअंतर्गत विविध लोकाभूमिक योजनांची माहिती जशी जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, जननी शिशु सुरक्षा योजना ,मानव विकास कार्यक्रम, नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना इ.बाबत माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
जनजागृती स्टॉल मध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ. देव चांदेवार,मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद भुते, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. मयुरी पटले, डॉ. परमानंद कठाने, डॉ. सेलुकर तसेच आरोग्य सहाय्यक आरिकर, आरोग्य सहायिका नागदेवे, आरोग्य सेविका गेडाम ,भुरे व राणे तर आशा सेविका वंदना सयाम यांनी सहभाग घेतला.