धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ च्या कामाची आमदार रहांगडालेनी केली पाहणी

0
18

तिरोडा:- तिरोडा तालुक्यात सिंचन विकासामध्ये आमदार विजय रहांगडाले यांचे महत्वपूर्ण कार्य असून त्यांच्या कारकिर्दीत धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा १ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येवून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.२ च्या योजनेकरिता २९० कोटी फडणविस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाइनच्या कामाला सुरुवात आली. आजपावेतो ९५ टक्के काम प्रगतीवर आहे हि योजना तिरोडा तालुक्यातिल शेतक-यांना लवकरात लवकर लाभ मिळो याकरिता सतत प्रयत्न असून येत्या दिवाळीनंतर जलपूजन करून तिरोडा तालुक्यातील बोदलकसा,चोरखमारा,रिसाळा,भदभदया तलावात पाईपलाईनद्वारे सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार रहांगडालेनी दिली. या पाहणी कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, उपसभापती भूमेश्वर रहांगडाले, भाजप जिल्हा महामंत्री मदन पटले, जी.प.सदस्य प्रवीण पटले, अमोल तीतीरमारे, संजय बैस, दिगम्बर ढोके, नितीन पराते, कार्यकारी उपभियंता पंकज गेडाम, मोंटू पालांदूरकर उपस्थित होते.